26 जानेवारी भाषण मराठी लहान मुलांसाठी सर्वोत्तम दिले आहे, तर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि तुमच्या सर्व मित्रांसह शेअर करायला विसरू नका.
26 जानेवारी भाषण मराठी लहान मुलांसाठी
२६ जानेवारी हा भारतातील प्रजासत्ताक दिन आहे. या दिवसाची तयारी करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी मराठीत भाषण आणि घोषणा कशा करायच्या हे शिकणे महत्त्वाचे आहे. हे काम सोपे व्हावे यासाठी आम्ही खास या निमित्ताने मराठीत भाषण दिले आहे. याव्यतिरिक्त, आम्ही उत्सव वाढविण्यासाठी चारोळी कविता देखील समाविष्ट केल्या आहेत. कविता आणि घोषवाक्यांसह हे भाषण प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. मराठीत २६ जानेवारीच्या भाषणाने सुरुवात करूया.
तुमचे २६ जानेवारीचे भाषण मराठीत सुरू करा
दिल दिया हैं, जान भी देंगे,ऐ वतन तेरे लिए ।
हम जियेंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिए।
हा देश स्वातंत्र व्हावा म्हणून ज्यांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले. त्या सर्वांना कोटी कोटी वंदन करतो.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय मुख्याध्यापक सर्व गुरुजन वर्ग आणि बालमित्रांनो, आज मी प्रजासत्ताक दिनाविषयी बोलणार आहे ते आपण शांतपणे ऐकावे ही विनंती.
आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र झाला परंतु आपला देश कसा चालवावा कारभार करताना कोणते कायदे असवित यासाठी घटना समिती नेमण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी या घटनेस मान्यता देण्यात आली. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. यालाच संविधान असे म्हणतात.
या संविधान निर्मितीमध्ये मोलाचे योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले, म्हणून त्यांना घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. भारतीय घटनेत सर्वांना न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता या मानवी मूल्याबरोबर हक्क व कर्तव्य यांची बीजारोपण केले आहे.आपण आपल्या हक्कासाठी जेवढे जागरूक राहतो तेवढे कर्तव्यासाठी राहत नाही परंतु एक कवी म्हणतात,
” हम न सोचे हमे क्या मिला हैं
हम ये सोचे किया क्या है अर्पण”
मला काय मिळाले? यापेक्षा मी देशाला काय दिले हे महत्त्वाचे आज खरच आपणाला स्वातंत्र्य मिळाले आहे असे वाटते का? आजही अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेरोजगारी या समस्या सतावत आहेत. “”आपलीच माणसे आपलीच माती करत आहेत’ धोरण लकण्याने विकास होत आहे, पण पर्यावरणा -चा विनाश होत आहे माणूस मारून कोणता विकास करतोय आपण? मित्रहो, मागे दीड-दोन वर्षापूर्वी ऑक्सिजनच्या श्वासापायी अनेकांनी तडफडून जीव सोडला. एका सूक्ष्मजीवाने बलाढ्य मानवी समुदायाला असा काही धक्का आणि धोका दिला की आजही आठवण झाली की काळीज चिरत
मित्रहो, आपल्या देशाच पर्यावरण जपण आणि आपली प्रत्येक कृती ही देशहिताला प्रथम प्राधान्य देणारी ठेवूया व खऱ्या अर्थाने देशाला प्रजासत्ताक बनवूया! एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद जय महाराष्ट्र ||
चारोळी कविता आणि घोषवाक्यांसह मुलांसाठी २६ जानेवारीचे मराठीतील भाषण प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आम्हाला आशा आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया टिप्पणी द्या.
अधिक अद्यतनांसाठी टेलिग्राममध्ये सामील व्हा | यहाँ क्लिक करे |
Official Website | यहाँ क्लिक करे |